३० सप्टेंबर १९९३ चा मराठवाडासाठी काळा दिवस:30 September 1993, Black Day for Marathwada.

३० सप्टेंबर १९९३ या दिवशी किल्लारी परिसरात महाप्रलयकारी भूकंप झाला होता.या महाप्रलयकारी भूकंपात शेकडो नागरिकांचा जीव गेला होता.तसेच अनेक गावे उधवस्त झाली होती.परंतु त्या दिवशी धरणीकंप झाला अन होत्याचे नव्हते झाले होते.१९९३ चा मुख्य केंद्रबिंदू किल्लारी व सास्तूर परिसरात होता.त्यानंतर महाराष्ट्र शासन व देश विदेशातील विविध संस्था यांच्या माध्यमातून भूकंपग्रास्त्नाना मदतीचा हात देणे सुरु झाला आणि त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करून त्यांचे जीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

गणेश विसर्जनाच्या रात्री किल्लारीसह इतर ठिकाणी झालेल्या भूकंपाची दहशत आजही कायम आहे.मागील ३० वर्षात म्हणजेच १९९९ ते आजअखेर १२८ वेळा भूकंपाचे धाके जाणवले आहेत.भूकंपाच्या नोंदी करिता कार्रात असलेल्या लातूर येथील भूकंप वेधशाळेत ह्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.४ जानेवारी १९९९ ते १० सप्टेंबर २०२१ पर्यत ९८ दिवसांत भूकंपाचे १०९ धक्के जाणवले आहेत शेवटचा भूकंपाचा (Earthquake) धक्का १३ अगस्ट २०२३ रोजी लातूरला जाणवला होता त्याची तीव्रता २.३ रिक्टर स्केल (Rector Skel)इतकी होती.३० सप्टेंबर १९९३ ला या भूकंपामध्ये अंदाजे ७,९२८ माणसे मृत्यूमुखी पडली.१५,८५४ जनावरे दगावली,१६,००० लोक जखमी झाले.५२ गावातील ३० हजारे घरे जमीनदोस्त झालीत,तर १३ जिल्हातल्या २ लाख ११ हजारे घरांना तडे गेले.

मराठवाडा व परिसरातील जिल्ह्यात होणारी भूकंपाच्या नोंदी ठेवण्यासाठी १९९३ च्या भुकंपा नंतर साधारण एक वर्षानंतर केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली लातूर येथे भूकंप वेधशाळा स्रुरू करण्यात आली मराठवाड्यातील आठ जिल्हासह यवतमाळ जिल्हातील भूकंपाच्या नोंदी या कार्यालयात घेतल्या जातात.कुठे भूकंपाचा धक्का झाला किंवा भुकंपासम गूढ आवाज झाला तर तत्काळ या वेधशाळेत संपर्क करून भूकंप झाला कि नाही किंवा झाला असेल तर किती रिक्टर स्केल (Rector Skel) चा होता याची माहिती प्रशासन,नागरिकांना मिळते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *