Maharashtra Online Mahiti

PM Kisan च्या पगारीचे चालू आहे वसुली …..

Pm kisan update

सुरू आहे वसूली अभ‍ियान –

सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी ऑडिट केले होते. यात देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक शेतकरी सरकारी नोकरी करतात अथवा आयकर भरतात. सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 31 मार्च 2023 पासून वसूलीसाठी अभ‍ियान सुरू आहे. याशिवाय अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी पंचायत पातळीवर ई-केवायसीदेखील करण्यात येत आहे.

आपले ई-केवायसी असणे आवश्यक –
पीएम क‍िसान न‍िध‍ीअंतर्कगत 27 जुलै रोजी खातेदारांना 14व्या हप्ता देण्यात आला होता. आपल्याला 15वा हप्ता घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी आपले ई-केवाईसी असणे आवश्यक आहे.

देशातील कोट्यवधी लाभार्थी पीएम किसान सन्मान निधीच्या 15 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र याच बरोबर सरकारने नोकरदार लोक आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी मोहीमही सुरू केली आहे.

अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पैसे परत केले नाही, तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत, एका शेतकऱ्याला वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात.

लाभ परत कसा करावा.

जर शेतकऱ्यांनी सदरील योजनेचा लाभ उचलला असेल आणि सध्या स्तिती तो तो लाभ परत करू इच्छितो असेल तर तो खालील संकेत स्थळावर जावून आपला नोंदणी क्रमांक प्रविस्थ करून आलेला ओ.टी.पी देवून मिळालेली रक्कम शासनास परत करू शकतो.

https://pmkisan.gov.in/pmkisanbenefitsurrender.aspx

pmkisan-money-retun.jpg
pmkisan-money-retun.jpg

PM Kisan १५ वा हप्ता कसा तपासावा?

  • पुढील दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करावे.येथे क्लिक करावे 
  • त्यानंतर Beneficiary Status Or Beneficiary List वर क्लिक करावे
  • त्या नंतर तुम्हाला पुढे दिलेल्या नोंदणी क्रमांक टाकून Enter लिक करावे
  • सबमिट (Submit) करावे
  • त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या रकमेची माहिती दिसेल.
Exit mobile version