“राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना “-Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana.

rajiv_gandhi_vidyarthi_suraksha_yojna

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षितीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यामार्फत 20 ऑगस्ट 2003 पासून राबविण्यात येत होती यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रित रित्या शासनाकडून अदा करण्यात येत होते विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबद्दल टाळाटाळ करीत होत्या किंवा उशीर रावी होत्या विद्यार्थ्यांच्या अपघाताचे जावे लवकर निकाली लागत नसल्याबाबत विमा कंपन्यामार्फत योजना बंद करून त्या ऐवजी सानुग्रह अनुदान योजना आयोजित तत्त्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने दिनांक 11 जुलै 2011 रोजी घेतला सदर योजना दिनांक 27 8 2010 ते 26 8 2012 पर्यंत राबविण्यात आली 

प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत राबविण्यात आलेल्या वरील योजनेची प्रभावी रित्या अमलबजावणी झाली असून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे या योजनेची फलश्रुती लक्षात घेता ही योजना दिनांक 27 ऑगस्ट 2012 पासून नियमित स्वरूपात सुरू करण्यात आली आहे सन 2013 पासून वाढलेली महागाई विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने प्रस्तुत योजना सुधारत करण्याची बाब शासनाने विचाराधीन होती या सर्व बाबींचा विचार करून पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे

अनुक्रमांक अपघाताची बाब सानुग्रह अनुदानाची रक्कम रुपये प्रस्तावासोबत तीन प्रतीक सादर करावयाची कागदपत्रे
1 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू 1,50,000/- 1. प्रथम खबरी अहवाल

2. स्थळ पंचनामा 

3. इन्कवेस्ट पंचनामा

4. सिविल सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मत विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर्व विच्छेदन आव्हान किंवा मृत्यू दाखला सिविल सर्जन यांनी प्रतिश्वासरीत केलेले

2 अपघातामुळे कायमचे अपंगत्व दोन अवयव दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी 1,00,000/- अपंगत्वाचा कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
3 अपघातामुळे कायमचे अपंगत्व एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी 75,000/- अपंगत्वाचा कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
4 विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त रक्कम 1,00,000/- शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
5 विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पहताना मृत्यू झाल्यास 1,50, 000/- सिविल सर्जन यांनी प्रतिसाक्षरित केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर्व विच्छेदन किंवा मृत्यू दाखला
6 विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास क्रीडा स्पर्धेत शाळेतील जड वस्तू पडून आगामी मुळे विजेचा धक्का वीज अंगावर पडून प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त रुपये 1,00,000/- हॉस्पिटलचे उपचाराबाबतचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह 

 

खालील बाबींचा समावेश या योजनेअंतर्गत केला जाणार नाही

       1.आत्महत्येचा प्रयत्न करणे

  1. आत्महत्या केव्हा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे
  2. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
  3. अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात
  4. नैसर्गिक मृत्यू
  5. मोटर्स शर्यतीतील अपघात.
राजीव-गांधी-अपघात-विमा-योजना
राजीव-गांधी-अपघात-विमा-योजना

कार्यपद्धती – विद्यार्थ्यांच्या पालकांनी समुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तीन प्रतीक संबंधित मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावे.

One thought on ““राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना “-Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana.

  1. योजना अतीशय महवाची व उपयुक्त आहे, ही योजना सामाजीक संस्थेमार्फत शाळेमध्ये राबवुन घ्यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *