- विविध घटकांचा होणार एकाच योजनेखाली लाभ
- मागेल त्याला लाभ देण्याच्या सूचना,कार्यपद्धती व निधीबाबत
- नवीन योजना आणली तरी लाभ शेतकर्यांना जलद गतीने मिळणार
- सोडत न काढता राबविण्याचे धोरण
- कृषी योजनांना पुरेसा निधी उपलब्ध होणार
योजनेत नऊ घटकांचा होणार समाविष्ट
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेत नौ घटकांचा समावेश होणार.त्यात मागेल त्याला फळबाग,मागेल त्याला ठिबक संच,मागेल त्याला तुषार सिंचन,मागेल त्याला त्याला शेततळे,मागेल त्याला शेततळे लागणारे अस्तारीकरण,शेडनेट,हरीतग्रह,बीबीएफ यंत्र व कॉटन श्रेडर यांचा समावेश होणार आहे.
कृषी विभागामार्फत सन २०२३-२४ करिता राबविण्यात येणाऱ्या “मागेल त्याला त्याला फळबाग,मागेल त्याला ठिबक संच,मागेल त्याला तुषार सिंचन,मागेल त्याला त्याला शेततळे,मागेल त्याला शेततळे लागणारे अस्तारीकरण,शेडनेट,हरीतग्रह,बीबीएफ यंत्र व कॉटन श्रेडर देणे या विस्तारित योजनेस या शासन निर्णयाद्वारे “छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना “ असे नाव देण्यात येत आहे.नुकतेच काढलेल्या शासन निर्णया प्रमाणे फक्त मूळ योजनेस “छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना”असे नाव देण्यात आले आहे.त्यामुळे सदर योजनेच्या अमलबजावणीच्या अनुषंगाने आदी केलेल्या मार्गदर्शक सूचना निर्णया प्रमाणे लागू राहतील.
राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणारा घटक/बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करून दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.त्यामुळे वित्त मंत्री महोदयांनी सन २०२३-२४ च्या अर्थ संकल्पा मध्ये आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येवून मागेल त्याला फळबाग,ठिबक/तुषार सिंचन ,शेततळे,शेततळयाला लागणारे अस्तरीकरण,शेडनेट,हरीतग्रह,आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस मण्यात दिली आहे