राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनीची ठळक वैशिष्ट्ये | Maharaj Rajashri Shahu Maharaj Scholarship Scheme For Maharashtra…

राजश्री-शाहू-महाराज-गुणवत्ता-शिष्यवृत्ती-योजना

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती हि योजना भारत  सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती चे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून, समाजातील प्रत्येक घटकासाठी गुणवत्तेच्या आधारावर विविध शिष्यवृत्ती ही प्रदान केली जाते.

महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती विविध शैक्षणिक संस्थाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. राजश्री शाहू महाराज यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शाळा स्थापन केल्या या शाळेमध्ये मुलांना मोफत शिक्षण देण्याची सोय केली. तसेच, विद्यार्थ्यांना वस्तीगृहची सुविधा प्रदान केली.

याच प्रेरणेतून महाराष्ट्र शासनाने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती ही देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्तीसाठी निवड केली जात आहे.

देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती सन 2023-2024 विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. महाराष्ट्र राज्य शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाजातील विद्यार्थ्यांसाठी तसेच युवकांसाठी विविध योजना आयोजित केली जाते या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व युवकांनी लाभ घ्यावा.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षांमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश (AIIMS, IIM, IIT, NIT, IISC, IISER) घेतलेल्या अनुसूचित जाती / नवबौद्ध विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी दिनांक 14/08/2023 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती २०२३-२४ Scholarship 2023-2024, शिष्यवृत्ती अटी व शर्ती.

शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना संरक्षण, डेव्हलपमेंट फीस, वस्तीगृह, व भोजन शुल्क यांच्या आकारणीप्रमाणे खर्च या शिष्यवृत्तीसाठी मार्फत दिला जातो. शैक्षणिक संस्थेतील वस्तीगृह व भोजन शुल्क यांच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या कार्यालयात स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात यावा.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता:

  • भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6.00 लाख पेक्षा कमी असावा.
  • पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 25वर्ष व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 इतकी असेल.
  • उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत जे विद्यार्थी प्रथमच या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी शिकत असतील असेच विद्यार्थी यांनी अर्ज करावा. परंतु प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास शिष्यवृत्ती देता येईल.
  • इयत्ता 10 व 12 वी परीक्षा ही विद्यार्थ्यांनी राज्य बोर्डाकडून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • पदवी अभ्यासक्रम मराठी इयत्ता 12 वी मध्ये 55% टक्के गुण असावे व डायरेक्ट द्वितीय वर्षासाठी प्रवेश विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये 55% टक्के गुण असावे
  • पदव्युत्तर अभ्यासमासाठी पदवी परीक्षेमध्ये किमान 55% टक्के गुण असावे..
  • इयत्ता दहावी बारावी तसेच पदवी हे राज्य शासनाच्या अधिकृत संस्थांमधूनच परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
  • आनलाईन अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .
  • गुणाची पात्रता व आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र असणार आहे.
    चुकीचे कागदपत्र अर्जासोबत दाखल केल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी बाद होईल. विद्यार्थ्यांची वयोमर्यादा या शिष्यवृत्तीसाठी निश्चित केलेली आहे.उच्च शैक्षणिक संस्था या परिशिष्ट ब नुसार विद्यार्थ्यांनी ज्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला आहे किंवा घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी परिपत्रकानुसार व अर्जानुसार माहिती निकष पूर्ण करून अर्ज पाठवण्यात यावे. सदरहू शिष्यवृत्ती देशपातळीवरील मान्यताप्राप्त संस्थेतमधील अभ्यासक्रमासाठी लागू असेल. या संस्थांची यादी संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात मधील परिशिष्ट ब मध्ये पहावयास मिळेल. या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या अटी व शर्ती विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनास राहील. निवड झालेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *